नाणारबद्दल शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, म्हणाले…

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोध तज्ज्ञांकडून समजाऊन संपवावा आणि बुध्दीमान कोकणी माणसाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हवी. त्याचे बरोबर कोकणसाठी समग्र पर्यटन धोरण आखण्याची मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज ठाकरेंना फोन केला आहे. 

शरद पवार यांचा फोन आल्याची माहिती स्वतः राज ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले कि, शरद पवार यांनी माझी नाणार प्रकल्पाबद्दल भूमिका योग्य असल्याचे म्हंटले आहे. आता पवारसाहेब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. 

तसेच, मुख्यमंत्री तुम्हाला मला वेळ देत नसतील तरी ते पवारांना नक्की वेळ देतील, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, महाराष्ट्राने रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचे म्हणणे रास्त होते. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज यावर मार्ग काढणं आवश्‍यक आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आह

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.