रांजणगाव गणपती-रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या समोर आज (दि. 26) पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचे रांजणगाव पोलिसांनी सांगितले.
आसाराम बाबासाहेब दराडे (वय 26, रा. पांगरा, ता. आष्टी, जि. बीड) व महेश प्रकाश गीते (वय 21, रा. धाड बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहेत. याबाबत नानासाहेब तबाजी पोटे यांनी रांजणगाव पोलिसांमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून (एमएच 16 एजी 9621) पुण्यावरून अहमदनगरच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला व तर जखमीस उपचारासाठी शिक्रापूरला ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक शुभांगी कुठे या करीत आहेत.