पुणे: काही दिवसांपूर्वीच जिओ कंपनीने आउटगोइंग कॉल साठी शुल्क आकारात ग्राहकांना धक्का दिला होता. परंतु आता जिओ ने ग्राहकांना खुश करणारे काही प्लॅन बाजारात आणले आहेत. कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या जिओ फोनसाठी हे प्लॅन असणार आहेत.
या ऑल इन वन प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०० मिनिटांसाठी इतर स्पर्धक कंपन्यांच्या मोबाईलवर मोफत कॉल करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. या प्लॅनमध्ये बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या स्पर्धक कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा २५ पट अधिक फायदा आहे असे रिलायन्स कडून सांगण्यात आले आहे.
ऑल इन वन पॅकमध्ये ७५ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन उपलब्ध असणार आहे. यामध्ये ग्राहक जिओ ते जिओ मोफत कॉल करू शकतील. त्यामध्ये इतर कंपन्यांच्या मोबाईलवर कॉलसाठी ५०० मिनिटांचा अवधी आणि ३ जीबी डेटा देण्यात आला आहे. यापैकी रोज १०० एमबी डेटा रोज वापरता येणार आहे. दुसरा प्लॅन १२५ रुपयांचा असून, यात जिओ ते जिओ मोफत कॉल, इतर कॉलसाठी ५०० मिनिटे आणि १४ जीबी डेटा देण्यात येणार आहे.
तसेच १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ मोफत कॉल, इतर कंपन्यांसाठी ५०० मिनिट आणि २८ जीबी डेटा दिला जाईल. तर १८५ रुपयांच्या प्लॅनसाठी जिओ ते जिओ मोफत कॉल्स, इतर कंपन्यांवर कॉल करण्यासाठी ५०० मिनिटे ५६ जीबी डेटा दिला जाईल.भारतातील जिओ फोनच्या ग्राहकांसाठी ही सर्वात चांगली ऑफर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.