अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यातून दोन भारतीय मुक्त 

नवी दिल्ली: मे 2018 मध्ये अफगाणिस्तानात केईसीच्या सात कर्मचार्‍यांना तालिबान्यांनी अपहरण केले होते. यापैकी दोघांना 31 जुलै रोजी वाचविण्यात आले असून ते भारतात परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

यापूर्वी चार जणांना वाचवण्यात आले आहे. एकूणच आतापर्यंत सहा जणांना वाचविण्यात आले असून आता फक्त एक भारतीय नागरिक तालिबानच्या ताब्यात आहे.

ईदपूर्वी अफगाणिस्तानात तालिबान आणि सरकारच्या सीझर फायर दरम्यान, तिन्ही भारतीयांना तालिबानच्या कब्जापासून मुक्त केले जाण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु याक्षणी केवळ दोनच जणांना वाचविण्यात यश आले आहे. मे 2018 मध्ये अफगाणिस्तानच्या उत्तर बागलाण प्रांतातील वीज प्रकल्पात काम करत असताना सात भारतीय आणि त्यांच्या अफगाण चालकांना तालिबानी गटाने अपहरण केले होते.

त्या बदल्यात, खंडणीची मागणी आणि अफगाणिस्तानच्या तुरूंगातील काही तालिबान कैद्यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली. या चर्चेनंतर मार्च 2019  मध्ये तालिबानने अपहरण केलेल्या भारतीयला सोडले होते, तर अन्य तिघांना ऑक्टोबर 2019 मध्ये अमेरिकेच्या सैन्याच्या ताब्यातून 11 तालिबानी अतिरेक्यांना सोडल्यानंतर मुक्त करण्यात आले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तान सरकारचे भारतीय अपहरणकर्त्यांना सोडविण्यात सतत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.