पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यातील एक मुलगी 17 वर्ष 11 महिने वयाची तर दुसरी 16 वर्ष वयाची आहे. पोलीस कॉन्स्टेबल अरुण शेकडे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलींचे आई, वडील, भाऊ, नवरदेव, नवरदेवाची आई, वडील अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात 24 मे रोजी दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता दोन मुलींचा बालविवाह झाला असल्याची बाब समोर आली. याबाबत पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे आई, वडील, भाऊ, नवरदेव, नवरदेवाची आई, वडील यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम तसेच कोव्हीड 19 चे कलम व साथ रोग, आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.