कोलंबो बॉम्बस्फोटात दोन कोट्याधीश व्यापाऱ्यांच्या मुलांचा हात 

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. यामध्ये ३ चर्च आणि ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट घडवून आणण्यात आले होते. प्रकरणात श्रीलंका पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. देशातल्या विविध भागातून या लोकांना अटक केली असून, याच लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मात्र, या हल्ल्याची चौकशी सुरु असून,अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहे. कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेलमध्ये स्फोट झाले ते स्फोट दोन भावांनी घडवले असून ते श्रीलंकेतल्या एका मोठ्या कोट्याधीश व्यापाऱ्यांची मुलं आहे. असं नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार समोर आलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.