नवी दिल्ली – पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांशी संबंधीत असलेली खाती ट्विटरने बंद करावीत. तसेच, आमच्या सुचनेनुसार ट्विटरने कारवाई केली नाही तर ट्विटरलाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही सरकारने दिला होता. यानंतर ट्विटरने ५०० खात्यांवर कारवाई केली आहे. मात्र काही अकाउंटच्या बाबतीत केंद्र सरकारसमोर झुकण्यास ट्विटरने नकार दिला आहे.
1000 पेक्षा जास्त ट्विटर अकाऊंट्स ब्लॉक करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचनेला ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटने उत्तर दिलंय. 26 जानेवारीच्या शेतकरी आंदोलनादरम्यान याविषयीची ट्विट मोठ्या प्रमाणावर होत होती. यानंतर 1000 पेक्षा जास्त अकाऊंट्स ब्लॉक करण्याच्या सूचना केंद्र सरकारने ट्विटरला दिली होती. सरकारच्या आदेशांचं काही प्रमाणात आपण पालन केलं असलं, तरी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांचे ट्विटर अकाऊंट्स आपण ब्लॉक करणार नसल्याचं ट्विटरने म्हटलंय.
26 जानेवारीच्या घटनांचा उल्लेख करत ट्विटरने म्हटलंय. “आमच्या ग्लोबल टीमने या काळात 24 तास अथक कव्हरेज दिलं.ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारा मजकूर, ट्विट्स आणि अकाऊंट्सवर न्याय्य आणि निष्पक्ष पद्धतीने कारवाई केली. तसेच कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करणारे काही ट्रेंड्सही थांबवण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले.
“स्पॅमिंग करणारे आणि या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणारे 500 पेक्षा जास्त ट्विटर अकाऊंट्स कंपनीने निलंबित केले. ही कारवाई गेल्या 20 दिवसांमध्ये करण्यात आल्याचे आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये ट्विटरने म्हटलं आहे.