नवी दिल्ली – जगप्रसिद्ध मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यांमुळे भारतातील ट्विटरच्या वापरकर्त्यांना सध्या अँड्रॉइड, आयओएस अथवा डेस्कटॉपवरून ट्विटरचा वापर करता येत नाहीये. ट्विटर डाऊन झाल्याबाबतची तक्रार आतापर्यंत हजारो वापरकर्त्यांनी विविध सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.