शिमला – हिमाचल प्रदेशात शनिवारी सकाळी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील धर्मशालापासून 22 किमी पूर्वेला पहाटे 5:17 वाजता 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
दरम्यान, यापुर्वी नववर्षात 5 जानेवारी रोजी दिल्ली भूकंपाच्या धक्कांनी हादरली होती. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. तेथे 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदू कुश परिसरात होते.