पिरंगुट – मुळशी तालुक्यात शुक्रवार (दि. 3) दिवसभरात एकूण बारा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकूण रुग्ण संख्या 83 इतकी झाली आहे. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर दिली.
बारा रुग्णांमध्ये पिरंगुटमध्ये तीन पुरुष, उरवडेत एक पुरुष व दोन महिला, भूगावमध्ये एक पुरुष व एक महिला, सुसमध्ये दोन पुरुष व एक महिला तर बावधनमध्ये एक पुरुष करोनाबाधित आढळला आहे. यापैकी एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यात बाधितांची आकडेवारी वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.