खेड तालुक्याचा बारावीचा निकाल ८७.९१ टक्के, यावर्षीही मुलीचीच बाजी

राजगुरुनगर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) खेड तालुक्याचा बारावीचा निकाल शेकडा ८७.९१ टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज राजगुरुनगर, नवमेश विद्यालय, चाकण  खेड तालुक्यातून बारावीच्या परीक्षेस बसलेल्या २८ जुनियर कॉलेजचे ५ हजार ०७२ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ४५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलांपेक्षा मुलीनी बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याची ९४.२२ टक्के प्रमाण आहे तर मुलांचे ८२.८३ टक्के आहे. बारावीच्या परीक्षेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दरवर्षी कमी कमी होत चालले आहे तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यात सर्वाधिक कमी निकाल रामभाऊ म्हाळगी ज्युनियर कॉलेज कडूस निकाल ६४.७० टक्के लागला आहे.

खेड तालुक्यामध्ये २८ ज्युनियर कॉलेज असून त्यांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे- 
हुतात्मा राजगुरु महाविद्यालय (राजगुरुनगर)- ९२.८८ टक्के, कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज,(वाडा)-९१.६०टक्के, सिताबाई पाटोळे ज्युनियर कॉलेज (चाकण)- ८९.०२ टक्के, संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज (आळंदी)- ८७.७१ टक्के,  म.फ.गायकवाड  विद्यालय ज्युनियर कॉलेज (दावडी)- ७५. ६७ रामभाऊ म्हाळगी विद्यालय ज्युनियर कॉलेज (कडूस)-६४.७० टक्के,  सुमंत उच्चमाध्यमिक विद्यालय (पिंपरी बुद्रुक)- ८५.२९ टक्के, नविन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मरकळ)-९६.२४ टक्के, शिवाजी विद्यालय (डेहणे)- ७७.०४ टक्के, रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय (आळंदी)-८०.५९ टक्के, आर्टस, कॉमर्स ज्युनियर कॉलेज (पाईट)-६९.५६ टक्के, नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय (काळूस)-८६.३६ टक्के.  महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज (राजगुरुनगर)-१०० टक्के, श्री भामचंद्र विद्यालय (भांबोली)- ९३. ६९ टक्के, पी के कॉलेज कडाचीवाडी (चाकण)-९३. २९ टक्के, भैरवनाथ विद्यालय (वाकी)-९२.३० टक्के, भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज (दोंदे)- ९४.२८ टक्के, उच्च माध्यमिक विद्यालय (वाशेरे) – ८६. ७९ टक्के, नवमेश विद्यालय (चाकण) -१०० टक्के, बी एम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (बिरदवडी)- ९६.९६ टक्के, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज (डेहणे) -९१.६६ टक्के, आर्ट्स कॉमर्स कॉलेज (राजगुरुनगर)- ८९.८५ टक्के. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय (राजगुरुनगर)-८३.३३ टक्के, शिवाजी विद्यामंदिर व सीताबाई भिकोब शेठ जुनिअर कॉलेज (चाकण)- ८८ टक्के, श्री समर्थ माध्यमिक विद्यालय (चिंबळी)-८५ टक्के, सुभाष माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज (खेड)-७३.६८ टक्के, श्री समर्थ ज्यनीयर कॉलेज(नाणेकरवाडी)-७१.४२ टक्के, ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज खेड-७८.५७ टक्के.

Leave A Reply

Your email address will not be published.