भुलेश्‍वरची श्रावण यात्रा रद्द !

पालखी सोहळा, कावड यात्राही नाही ; केवळ नित्य पूजा पुजारी करणार

भुलेश्‍वर : संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या भुलेश्‍वर महादेवाची श्रावण यात्रा मंगळवार (दि. 21) पासून सुरू होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

तसेच पालखी सोहळा, कावड यात्राही होणार नाही. फक्‍त पुजारी येऊन मंदिरात नित्य पूजा करतील. यात्रा काळात जर कोणी याठिकाणी आले तर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिला.

मंदिरातील सुरक्षा, व यात्रा नियोजन या विषयावर चर्चा करण्यासाठी भुलेश्‍वर महादेवाच्या डोंगरावर श्रावण यात्रा नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी एकमताने यात्रा रद्दचा निर्णय घेण्यात आला असे तहसीलदार सरनोबत यांनी जाहीर केले.

यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकुश माने, भारतीय पुरातत्त्व विभागाचे राहुल बनसोडे, पंचायत समिती पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोनपे, वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव, सरपंच महादेव बोरावके, ग्रामसेविका सोनाली पवार, मंडल अधिकारी भारत भिसे, तलाठी सतीश काशीद, भुलेश्‍वर सेवा ट्रस्ट अध्यक्ष अरुण यादव, देवस्थानचे सर्व पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.