मुंबई – अभिनेत्रीचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणं आजकाल कॉमन गोष्ट झाली आहे. चाहते आपल्या स्टार्सच्या नवीन अपडेटवर भरभरून प्रेम देताना दिसतात. यामुळेच सेलिब्रेटींच्या अनेक पोस्ट सर्रास व्हायरल देखील होतात. यामुळे कधी कधी सेलिब्रेटींना त्रासही सहन करावा लागतो. जस चाहते भरभरून प्रेम देतात तस अनेक जण ट्रोलही करतात. याचाच प्रत्येय अभिनेत्री त्रिशा कर मधुला नुकताच आला.
अभिनेत्री त्रिशा तिच्या कथाकथित एमएमएसमुळे चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे आजही जेव्हा तिचे नाव चर्चेत येते तेव्हा तेव्हा सर्वांना तिचा व्हायरल झालेला एमएमएस नक्कीच आठवतो. आता मात्र त्रिशा सध्या तिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. त्रिशाने इंस्टाग्रामवर स्वतःची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ज्यामध्ये तिने आकर्षक असा चमकदार ड्रेस घातला आहे.
त्रिशाने या लूकमध्ये साधा मेकअप केलेला आहे त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने आपल्या पोटावर हात ठेवत विविध पोज देत अनेक फोटोज शेअर केले आहेत. यावरूनच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केल्याचे समजते.
एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, काही गुड न्यूज आहे का? तर दुसर्याने, ‘तू प्रेग्नेंट आहेस का?’ असा सवाल विचारला आहे. तर अनेकांनी तिला अभिनंदन म्हणत शुभेच्छांच्या कमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्रिशाला फिटनेसकडे लक्ष देण्याचे देखील आवाहन केले आहे.
२७ वर्षीय त्रिशाकर मधु ही अभिनेत्री साऊथसह भोजपुरी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहे. तिची अनेक बोल्ड आणि हिट व्हिडिओ गाणी इंटरनेटवर तुफान व्हायरल होतात. त्रिशाने काही टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले आहे. बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. सध्या ती व्हायरल फोटोजमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
MMS मुळे आली होती चर्चेत
त्रिशा कर मधुचा एक एमएमएस गेल्या वर्षी इंटरनेटवर व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. लोक अजूनही त्रिशाला विचारतात की तिने असं का केलं? व्हिडिओ कसा लीक झाला? तेव्हापासून त्रिशावर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे.तेव्हापासून सर्वजण त्रिशाकर मधु कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीत एकापेक्षा एक बोल्ड आणि ग्लॅमरस नायिका आहेत, ज्या आपल्या सौंदर्याच्या जादूने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.