महागड्या दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

Madhuvan

  • आठ दुचाकी हस्तगत; गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

पिंपरी – महागड्या दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेसात लाखांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या.

अमरेश किसन चव्हाण, (वय 19, रा. सध्या डुडुळगाव, मोशी मुळगाव कर्नाटक), किरण नरसिंग राठोड (वय 20, रा. वडगाव, ता. मावळ. मूळगाव कर्नाटक) आणि करण अर्जुन कुऱ्हाडे (वय 19 रा. साईसमर्थनगर, वडगाव, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्‍टोबर रोजी पहाटेच्यावेळी चिखली पोलीस ठाणे हद्दीतील नेवाळेवस्ती येथून एकाच वेळी दोन बुलेट दुचाकी चोरीस गेल्या होत्या. या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा मिळविला. त्यानुसार आरोपींना तळेगाव आणि मोशी येथून ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी चोरलेल्या आठ दुचाकी कर्नाटक येथे विक्रीसाठी नेऊन ठेवल्याची कबुली पोलिसांना दिली. त्युानसार पोलिसांनी त्या दुचाकी हस्तगत केल्या. आरोपीकडून एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी चिखलीच्या एका गुन्ह्यात दोन दुचाकी चोरीस गेल्या होत्या.

आरोपींकडून दोन बुलेट, तीन एफ.झेड, दोन पल्सर आणि एक पॅशन अशा एकूण आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अटक आरोपी करण कुऱ्हाडे हा मूळचा तळेगाव येथील रहीवाशी असल्याने त्याला पिपरी चिंचवड शहरातील रस्त्याची संपूर्ण माहिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.