मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार; दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सोमवारी (दि.19) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक –

सकाळी 09:00 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
– सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे),
– सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
– सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी,
– सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण,
– सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी,
– सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
– दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
– दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
– दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,
– दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
– दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

शरद पवार हे देखील उद्यापासून दौऱ्यावर असणार आहेत. ते तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद भागात पाहणी करणार आहेत. ते 18 आणि 19 ऑक्‍टोबर असा दोन दिवस दौरा करणार आहेत.

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यांचा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. बारामतीपासून हा दौरा सुरु होणार असून कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.