पुणे – पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. स्वारगेट, मुंढवा, खडकी, अलंकार, वारजे माळवाडी, उत्तमनगर, खडक, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी रात्री दिले.
पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठुन कोठे बदली झाले ते ठिकाण पुढीलप्रमाणे- संगीता जाधव (वरिष्ठ निरीक्षक, बिवेवाडी ते गुन्हे शाखा (भरोसा सेल), अशोक इंदलकर (वरिष्ठ निरीक्षक, स्वारगेट ते वाहतूक शाखा), सुनील झावरे (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट), विष्णू ताम्हाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा), राजेंद्र सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार ते वरिष्ठ निरीक्षक खडकी), राजेश तटकरे (वरिष्ठ निरीक्षक).
लष्कर ते वरिष्ठ निरीक्षक अलंकार), सुनील जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर ते वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी), किरण बालवडकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर), डी. एस. हाके (वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी ते सायबर पोलीस ठाणे), सुनील माने (वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग ते वरिष्ठ निरीक्षक खडक), विनायक वेताळ (वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क ते आर्थिक गुन्हे शाखा), नीलिमा पवार (वाहतूक शाखा ते कोरेगाव पार्क), दत्ताराम बागवे (पोलीस निरीक्षक गुन्हे वारजे ते विशेष शाखा), अजय कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस).