रस्त्याने प्रवास करताना मोबाईलचा वापर करू नये असे आपल्याला घरच्यांकडून आणि पोलिसांकडून वारंवार सांगितले जाते. कारण या मोबाईलमुळे कधी मोठी दुर्घटना घडेल हे काही सांगता येत नाही.या मोबाईलमुळे दोन ट्रेन मधील जबरदस्त अपघात झाल्याचा एक व्हिडीओ सध्या मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.त्यामुळे प्रवासादरम्यान मोबाईल वापरायचा का नाही हे तुम्हीच ठरवा.
नेमकं असं काय घडलं ?-
एक महिला चालक ट्रेन चालवत होती. मात्र ट्रेन चालवताना तिचं लक्ष आपल्या मोबाईल फोनमध्ये होतं. तेवढ्यात समोरून एक ट्रेन आली.संपूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे तिला समोरच्या ट्रेनचा अंदाज आला नाही. बरं ट्रेन रुळांवर पळतात त्यामुळे इतर वाहनांप्रमाणे रस्ता कट मारून जाण्याची सोय नसते.
अखेर नको तेच घडलं.दोन्ही ट्रेन एकमेकांवर आदळल्या.जेव्हा दोन्ही ट्रेनची धडक झाली तेव्हा ही महिला चालक भानावर आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. भरदाव वेगानं पळणारी ट्रेन अचानक आदळल्यामुळे प्रवासी देखील अक्षरश: उडून खाली पडले. काही जणांना तर गंभीर दुखापत सुद्धा झाली.ही संपूर्ण घटना ट्रेनमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
driving a train while on a smartphone pic.twitter.com/CZA23skxdv
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 20, 2023