अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शनखाली तयार झालेल्या “पाताल लोक’ या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. सध्या लॉकडाऊन लागू असल्याने लोकांनी जुने सिनेमे आणि सिरीयल पुन्हा पुन्हा बघण्याऐवजी त्यांच्या समोर नवीन वेब सिरीज आणण्याचा प्रयत्न काही प्रॉडक्शन हाऊसने सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसने तयार केलेली वेब सिरीज “पाताल लोक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या वेब सिरीजचे ट्रेलर अलिकडेच प्रसिद्ध झाले. 9 एपिसोडची ही वेब सिरीज 15 मे पासून रिलीज होणार आहे.
या वेब सिरीजच्या माध्यमातून अनुष्काने डिजीतल वर्ल्डमध्ये पदार्पण केले आहे. या ट्रेलरमध्ये खूपच मारधाड आणि ऍक्शनचा प्रचंड भरणा दिसतो आहे. त्यामुळे ही वेब सिरीज ऍक्शन आणि थ्रिलर बेस्ड असणार हे तर समजून चुकले आहे. या वेब सिरीजमध्ये ऍक्शनबरोबर सस्पेन्सही भरपूर असणार आहे. एकाच वेळी अतिश्रीमंत, मिडल क्लास आणि गरीबांच्या विश्वातील गुन्हेगारीचे दर्शन या ट्रेलरमधून घडते. स्वर्गातील अतिश्रीमंत, पृथ्वीवर मध्यमवर्गीय आणि पाताल लोकातील गरिबांच्या विश्वातील क्राईम वर्ल्ड असा या वेब सिरीजचा मुख्य थीम आहे.