विश्रांतवाडी : धानोरी येथील रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी संचलित पृथ्वी स्पोर्टस झोन क्रिकिंडम तर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे शहरातील नायडू हॉस्पिटल, ससुन हाॅस्पिटल, कमला नेहरू हाॅस्पिटल, वायसीएम हाॅस्पिटल तसेच व्हेईकल डेपोमधील कर्मचारी, सुरक्षारक्षक, वाहनचालक, अत्यावश्यक सेवा देणारे बांधव यांना मास्क देण्यात आले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जोखीम पत्करून वार्तांकन करणारे पत्रकार बांधवांना पुर्ण चेहरा झाकेल असे फेसमास्क देण्यात आले. यावेळी पृथ्वी स्पोर्टस झोन क्रिकेट अकादमीचे संचालक माऊली टिंगरे, छावाप्रमुख धनंजय जाधव,ओम ॲम्बुलन्सचे शरद कात्रजकर, पराग दहिवळ व कर्मचारी उपस्थित होते.