मेट्रोतर्फे ट्रॅफिक वॉर्डन, क्‍यूआरटी टीम

मेट्रो मार्गिकेतील वाहन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी उपाययोजना

पुणे – मेट्रोने नेमलेल्या ट्रॅफिक वॉर्डन आणि क्‍युआरटी टीमच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्याला मदत होत असल्याचा दावा “महामेट्रो’ने केला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मेट्रोने कामाच्या ठिकाणी बॅरिकेट लावले आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी काही ठिकाणी कमी झाली आहे. अशा ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी मेट्रोने ट्रॅफिक वॉर्डन नेमले आहेत. हे ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक पोलिसांना मदत करीत असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास मदत होत आहे, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी पुणे मेट्रोने 4 सहायक पोलीस आयुक्‍त दर्जाचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे 9 सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक अधिकारी यांची नियुक्‍ती केली आहे. वाहतूक पोलिसांशी नियमित संवाद साधणे आणि एकत्रितपणे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे मेट्रोने एकूण 260 ट्रॅफिक वॉर्डन नियुक्‍त केले आहेत. हे ट्रॅफिक वॉर्डन सी.एम.ई. चौक, फुगेवाडी चौक, परमहंस चौक, गुजरात कॉलनी चौक, शिवतीर्थ चौक, आठवले चौक, नळ स्टॉप चौक आदी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कार्यरत असून वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनासाठी मदत करत आहे. या व्यतिरिक्‍त मेट्रो मार्गिकेतील कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा रस्ता दुर्घटना ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्यासाठी जलद कृती दल (र्टीळलज्ञ ठशीिेपीश ढशरा टठढ) नियुक्‍त करण्यात आले आहे.

एका जलद कृतिदलामध्ये एक चारचाकी आणि चार ट्रॅफिक वॉर्डन असून त्यांच्याजवळ प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड) इतर तातडीची मदत पुरवण्याचे साहित्य देण्यात आले आहे. यामध्ये स्ट्रेचर, फायर एकत्रित व्हिशर, सर्च लाइट, लाइट बॅटन, लाल व हिरवे रंगाचे झेंडे, सायरन, ऍम्प्लिफायर साधनांचा समावेश आहे.

दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात
जलद कृती दल मेट्रो मार्गिकेमध्ये होणारे अपघातस्थळी मदत देत असून आतापर्यंत अनेक दुर्घटनाग्रस्त नागरिकांना माहिती देऊन नजीकच्या रुग्णालयामध्ये पोहोचवून आरोग्य सुविधा दिल्या आहेत. या व्यतिरिक्‍त अपघातस्थळी पोलिसांना पाचारण करणे हे काम देखील क्‍यूआरटी दल करत आहे. एकूण 3 क्‍यूआरटी (जलद कृती दल) टीम पुणे मेट्रोने स्थापन केले आहेत. या जलद कृती दलाने आतापर्यंत रिच 1 विभागात 180 वेळा, रिच 2 विभागात 31 वेळा, रिच 3 विभागात 26 वेळा अपघातस्थळी तातडीने मदत पोहोचवली आहे. मेट्रोने मोक्‍याच्या ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड लावले असून, त्याद्वारे वाहतूक चिन्हे व संदेश यांचे प्रसारण करण्यात येते. तसेच वाहतूकविषयी सूचना देखील या डिस्प्लेद्वारे वेळोवेळी देण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)