‘मला माफ करा’; सीसीडीच्या मालकाचे पत्र 

बंगळूरू – प्रसिद्ध ‘कॅफे कॉफी डे’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, व्ही. जी. सिद्धार्थ यांनी कर्मचाऱ्यांना लिहलेले एक पत्र समोर आले आहे.

काय आहे पत्रात?
माझ्यावर ज्या लोकांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. मी खूप संघर्ष केला. परंतु, एका भागीदाराचा दबाव आणत असून तो आणखी सहन करु शकत नाही. कारण माझ्यावर सातत्याने शेअर विकण्यासाठी दबाव आणला जात आहे. यासाठी मी सहा महिन्यांपूर्वी एका मित्राकडून पैसे जमा केले होते. त्याचबरोबर इतर कर्जदारांचाही माझ्यावर प्रचंड दबाव आहे. आयकर विभागाच्या तत्कालीन महासंचालकांनीही माझा प्रचंड छळ केला आहे. मी प्रत्येक कर्मचाऱ्याला कणखर राहण्याची विनंती करतो. मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करतो आहे हा व्यवसाय आता नव्या संचालक मंडळाकडे देण्याची वेळ आली आहे. ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या सर्व माझ्या एकट्याच्या आहेत. माझे कर्मचारी, ऑडिटर आणि व्यवस्थापनाला माझ्या सर्व व्यवहाराची माहिती नाही. मी उद्योगपती म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलो आहे. कोणाची फसवणूक करण्याचा माझा उद्देश नव्हता. एकेदिवशी तुम्हाला हे समजेल. मी तुमची माफी मागतो, मला माफ करा, अशा आशयाचे पत्र सिद्धार्थ यांनी कर्मचारी आणि व्यवस्थापनाला संबोधून लिहिले आहे.

दरम्यान, व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या पत्रावरून त्यांना कर्जबाजारी झाले असल्याने नैराश्य आल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली असावी, अशा चर्चांनी आता जोर धरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.