टोयोटाची ‘बलेनो’ लाँच; जाणून घ्या किंमत 

नवी दिल्ली – जापनीज कार मेकर टोयाटोने भारतामध्ये आपली नवी कार लाँच केली असून प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील या कारचे नामकरण टोयोटा ‘ग्लांझा’ असं करण्यात आलं आहे. टोयोटा आणि मारुती-सुझुकी या सुपरसिद्ध कार मेकर्सने एका कराराद्वारे कोलॅब्रेशन घडवून आणलं असून या कराराअंतर्गत मारुती-सुझुकी कंपीनीच्या भारतीय मार्केटमधील सुपरहिट हॅचबॅक बलेनो आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रीझा या दोन गाड्यांचे डिझाईन टोयोटा वापरू शकणार आहे.

टोयोटाची नवी कार ‘ग्लांझा’चा लूक हुबेबुब मारुती-सुझुकीच्या बलेनो सारखा असून टोयोटाने ग्लांझाचे केवळ पेट्रोल व्हर्जन लाँच केले आहे. १.२ लिटर इंजिन क्षमता असलेली टोयोटाची ग्लांझा ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर ट्रान्समिशन अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्लांझामध्ये टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला असून त्यामध्ये अँड्रॉइड व ऍपल कार-प्ले ही फीचर्स देण्यात आली आहेत.

टोयोटाने भारतीय बाजापेठेमध्ये या कारची किंमत ७.२२ लाखांपासून ८.९ लाखांपर्यंत ठेवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)