काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का?

हैद्राबाद- २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवतून अजून काँग्रेस पूर्णपणे सावरलेली नसतानाच, पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्त्यता आहे. तेलंगणातील काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदारांनी तिथल्या विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. आपल्या गटाला तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी या आमदारांनी केली आहे.

त्यामुळे आता, १८ मधले १२ आमदार गेले तर काँग्रेसचे फक्त ६ आमदार या ठिकाणी उरतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.