वाघोलीतील कार सर्व्हिस सेंटर खाक

मध्यरात्री आग लागल्याने जीवितहानी नाही; वित्तहानी मोठी

वाघोली – येथील साई सर्व्हिस कार सेंटरला मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक व अग्निशमनदलाच्या वतीने तीन ते चार तास प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये सुदैवाने जीवितहानी नाही. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघोली (ता. हवेली) येथील पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या साई मारुती कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला शनिवारी (दि. 24) मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमध्ये स्पेअरपार्टचे गोडाऊन आणि कार्यालयासह कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.

या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक नागरिकांनी व पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन ते चार तासांत आग आटोक्‍यात आणली. मात्र, या गाड्या पोहोचेपर्यंत आगीमध्ये मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना ऑईल ड्रमच्या स्फोटामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. मारुती शोरूम परिसरात असलेल्या गाड्या आगीपासून बचावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)