“नीट’साठी दि.2 सप्टेंबरपासून करता येणार अर्ज

पुणे – एमबीबीएस आणि एमडी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेची (नीट) तारीख रविवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केली आहे. पुढील वर्षी 3 मे 2020 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना पींरपशशीं.पळल.ळप या साइटवर अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ही परीक्षा देणाऱ्या यावर्षीतील सर्व बारावीतील विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र असणार आहेत. नीट परीक्षा तीन तासांची असणार आहे. या पेपरमध्ये तीन सेक्‍शन असतील. फिजिक्‍स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांवर 180 प्रश्‍न विचारले जातील. यात 90 प्रश्‍न हे बायोलॉजीच्या विषयावर असतील. तर फिजिक्‍स आणि केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 45-45 प्रश्‍न असतील.

अशी असेल परीक्षा प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबरपर्यंत
दि.27 मार्चपासून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार
दि. 3 मे 2020 रोजी होणार परीक्षा
दि.4 जून रोजी लागणार परीक्षेचा निकाल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×