250 होर्डिंग्ज, 55 हजार खांबांवर होणार जाहिराती
संयुक्त जाहिरात धोरणाच्या पालिकेच्या निविदा जाहीर
स्ट्रीट फर्निचरचाही समावेशया धोरणात नागरिकांच्या सुविधांसाठी उभारण्यात आलेल्या स्ट्रीट फर्निचरवरील जाहिरातींचा समावेश असणार आहे. महापालिकेने त्यासाठी पाच झोन निश्चित केले असून त्यानुसार सर्वाधिक रक्कम देणाऱ्या कंपनीस या जाहिरातफलकांची हद्द पंधरा वर्षांसाठी देण्यात येणार आहे.
पुणे – महापालिकेच्या मिळकतींवर जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्त जाहिरात धोरण राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 250 हून अधिक होर्डिंग्ज तसेच 55 हजारांवर अधिक पथदिव्यांच्या जागा निश्चित केल्या आहेत.
या जाहिरात फलकांसाठीची निविदा महापालिकेने जाहीर केली असून पाच विभागांमध्ये या जाहिरातींची विभागणी करण्यात आली आहे. त्यातून पालिकेस तब्बल 100 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेचे स्ट्रीट फर्निचर, तसेच रस्त्यांकडेच्या मिळकतींमध्ये जाहिरात फलक उभारून त्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी मिळकतींवरील जाहिरात धोरण प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यानुसार पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीकडून संयुक्त स्वरूपात हे धोरण राबविले जाणार आहे. यात उड्डाणपूल, महापालिकेच्या इमारती, मोठी वाहने, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, विद्युत पोल, ऍमेनिटी स्पेस, मैदाने, क्रीडा
निकेतनच्या शाळा, क्रीडा संकुले, सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा 10 ते 12 घटकांचे सर्वेक्षण आले. त्यात तब्बल 250 होर्डिंग्ज उभारता येथील, एवढ्या साईट्स सापडल्या आहेत.