मेष : नोकरीत महत्वाची कामे हातावेगळी करा. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. जोडधंद्यातून फायदा होईल.
वृषभ : नवीन महत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. महिलांनी अतिहव्यासापोटी जादाची कामे स्विकारु नयेत.
मिथुन : दगदग धापवळ कमी करावी. आवडत्या छंदात वेळ घालवाल. तरुणांना नवीन व्यक्तींबाबत आकर्षण वाटेल.
कर्क : विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा. ग्रहमान हळूहळू सुधारत आहे. कामाचा उत्साह वाढेल.
सिंह : व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात विस्तार करण्याचे बेत सफल होतील.
कन्या : बेकारांना नवीन नोकरीची संधी कलाकार खेळाडूंना मानमरातब मिळेल. अध्यात्मात प्रगती होईल.
तूळ : प्रियजनांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. नवीन जागा, वास्तू खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.
वृश्चिक : तुमच्या रसिक व कल्पक स्वभावाला पूरक ग्रहमान लाभल्याने जीवनाचा आनंद पुरेपूर लुटाल.
धनू : व्यवसायात अडथळे दूर झाल्याने कामांना गती येईल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश संपादन करु शकाल.
मकर : खेळत्या भांडवलाची गरज हितचिंतकाच्या मदतीने भागेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील.
कुंभ : नोकरदार व्यक्तिंना मनाप्रमाणे कामे केल्याने आनंद मिळेल. एखादी सवलतही वरिष्ठ देतील.
मीन : घरात कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कुटुंबासमवेत सहजीवनाचा आनंद घ्याल. प्रकृतीमान सुधारेल.