आजचे भविष्य (सोमवार,26 एप्रिल 2021)

मेष : स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.

वृषभ : नोकरीत जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल.

मिथुन : नोकरीत टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे दगदग धावपळ वाढेल.

कर्क : वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सुखसुविधा देतील. अपेक्षित पत्रव्यवहारांना गती येईल.

सिंह : जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत तुमच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा सफल होतील.

कन्या : नोकरीत अतिमहत्वाकांक्षेच्या आहारी जाऊ नका. कामात बिनचूक राहून कामे वेळेत उरका.

तूळ : नोकरीत हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा चंग बांधाल. कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल.

वृश्‍चिक : पैशाची ऊब मानसिक स्वास्थ्य उत्तम राखेल. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील.

धनू : ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता प्रत्यक्ष पडताळा करून मगच निर्णय घ्या.

मकर : योग्य व्यक्तिंची निवड योग्य कामासाठी कराल. नोकरीत वरिष्ठ कामे पूर्ण करण्यासाठी तगादा लावतील.

कुंभ : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युक्ती शोधाल. नोकरीत कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.

मीन : आर्थिक स्थिती नाजूक राहील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळवण्याचे कल राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.