मेष : व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील.
वृषभ : तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल.
मिथुन : आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. कामाचे कौतुक होईल.
कर्क : कामाचे वेळी काम करुन इतर वेळी जीवनाचा पूरेपूर आस्वाद घेण्याकडे कल राहील.
सिंह : घरात सुखद प्रसंग साजरे होतील. व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल. कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील.
कन्या : नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील. पैशाची स्थिती समाधानकारक राहील.
तूळ : नोकरीत अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्याल व इतर कामे सोयीस्करपणे लांबणीवर टाकाल.
वृश्चिक : बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. विचारापेक्षा कृतीवर भर दया.
धनु : घरात कुटुंब समवेत प्रवासाचे बेत सफल होतील. तुमच्या कामातील गुणांची कदर सर्वजण करतील.
मकर : महिलांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल. बराच काळ रेंगाळलेली कामे तातडीने हाती घेवून संपवा.
कुंभ : नंतर त्याला फाटे फुटतील व तुमची विनाकारण चिडचिड होईल. तूर्तीस घरात बदल करू नयेत.
मीन : व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करुन उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील.