नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी वेळोवेळी देशवासियांना संबोधित करत असतात. आज देखील ते या विषयासंदर्भात एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता देशवासियांसाठी एक व्हिडीओ संदेश प्रसारित करणार आहे, असे यात त्यांनी म्हटले आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आता नेमकी काय भूमिका घेणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
At 9 AM tomorrow morning, I’ll share a small video message with my fellow Indians.
कल सुबह 9 बजे देशवासियों के साथ मैं एक वीडियो संदेश साझा करूंगा।
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2020
सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. देशात अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 50 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे संकट हे युद्धापेक्षा मोठे असल्याचेही म्हटले होते. आता आज, शुक्रवारी सकाळी 9 वाजता ते काय संदेश देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.