नवी दिल्ली : करोनाला रोखणाऱ्या दोन लसींना केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानंतर आता देशात लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सहा कंटेनर रवाना करण्यात आले. त्यानंतर आता १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस घेऊन जाण्यासाठी तीन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची विमान सज्ज झाली आहेत.
दरम्यान, एका गाडीमध्ये २३ बॉक्स बसतात. एका बॉक्स मध्ये १२०० लसीचे क्युब्ज आहेत. १२ हजार लोकांना ही लस देण्यात येणार आहेत. अशा तीन गाड्या आज रवाना झाल्या आहेत. आत्ता त्या अहमदाबादला पाठवत आहेत. अन्य लगेज चढवल्यानंतर शेवटी या लस चढवणारआहेत कारण त्याचे वातावरण मेन्टेन राहावे म्हणून एअर इंडियाने जात आहेत. स्टेशन मॅनेजर प्रसन्न मिस्त्री हे समन्वयक आहेत. दहा जणांना यासाठी नियुक्त केले आहे. ते या संदर्भातील दळणवळणाचे काम रोज पाहणार आहेत.
Today, Air India, SpiceJet and IndiGo Airlines will operate 9 flights from Pune with 56.5 lakh doses to Delhi, Chennai, Kolkata, Guwahati, Shillong, Ahmedabad, Hyderabad, Vijayawada, Bhubaneswar, Patna, Bengaluru, Lucknow & Chandigarh, says Union Civil Aviation Min Hardeep S Puri https://t.co/9QhSUWF1WC
— ANI (@ANI) January 12, 2021
केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याविषयी माहिती दिली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून लस देशभरात पोहोचवली जाणार आहे. आज (१२ जानेवारी) एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून लसीचे ५६.५ लाख डोस वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. यात पुण्यातून विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांच्या मदतीने लसीकरणासाठी तयारी केली असून, लसीकरण कार्यक्रमाआधी ड्राय रनही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर लसीचे डोस वितरित करण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी लस घेऊन सहा कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले.