पुणे – राज्यात करोनाबाधित रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. पुण्यातही करोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आज (ता. 09) दिवसभरात 1086 नवीन करोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. तर करोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रूग्णांपैकी पाच रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील करोनाबाधितांची संख्या वाढून 2 लाख 10 हजार 169 इतकी झाली आहे. तर अॅक्टिव्ह रूग्णसंख्या 7020 आहे. आतापर्यंत करोनामुळे 4903 रूग्णांचा मृत्यू झाला असून 1 लाख 98 हजार 246 रूग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात एकूण 6090 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली.