“गुड न्यूज’मधून डेब्यू करणार तैमूर अली खान

बॉलीवूडमधील नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर-खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा सर्वाधिक पॉप्युलर स्टार किड्‌सपैकी एक आहे. त्याचे फोटोज्‌, व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात.काही दिवसांपूर्वी तैमूर नावाची डॉल आणि त्याच्या नावाचे कुकीज मार्केटमध्ये आले होते.

एवढया कमी वयातच त्याला मिळल असलेल्या प्रसिद्धीमुळे ही त्याची बॉलिवुडमध्ये येण्याची तयारी असल्याचे मानले जात आहे. त्यातच तो आपली आई करीनाच्या आगामी “गुड न्यूज’मधून चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार असल्याचे समजते. यात त्याचा 10 मिनिटाचा कॅमियो अपियरेंस असणार आहे.

तसेच “गुड न्यूज’च्या सेटवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात कियारा आडवाणीसोबत तैमूर झळकला होता. तेव्हा असे सांगण्यात आले होते की, आपल्या आईला भेटण्यासाठी तैमूर सेटवर आला होता. पण आता असे समजते की, तो शूट करण्यासाठीच आला होता.

या चित्रपटासाठी तैमूरने दोन सीन्स शूट केले असून त्याच्यासोबत करीना आणि अक्षय कुमार असणार आहेत. या शूटिंगवेळी तैमूरच्या उपस्थितीमुळे खूपच मज्जा आली, असे टीमकडून सांगण्यात आले आहे. “गुड न्यूज’मध्ये करीनाशिवाय अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी झळकणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.