सोरतापवाडी – टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील टिळेकर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यावेळी अध्यक्षपदी अक्षय शरद टिळेकर तर उपाध्यक्षपदी धनंजय भीमराव टिळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश बांदल यांनी घोषित केले.
टिळेकरवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रथमच टिळेकरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला संचालक म्हणून वाव मिळाल्याने सोसायटीची चावी तरुणांच्या हाती आल्या आहेत. यावेळी संचालक किसन टिळेकर, श्याम टिळेकर, बाळासाहेब टिळेकर, जगन्नाथ टिळेकर, विठ्ठलराव थोरात, विठ्ठल बेगळे, पोपट जाधव, रंगनाथ चौरे, माया टिळेकर, सविता लोणकर, संस्थेचे सचिव हनुमंत जगताप, ग्रामसेविका स्वाती राजगुरू, श्रीदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, उरूळीकांचन सोसायटीचे अध्यक्ष आबासाहेब टिळेकर, पोलीस पाटील विजयराव टिळेकर, सुभाष टिळेकर, रवींद्र लोणकर यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाला कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.