मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार ‘सलमान खान’ आणि अभिनेत्री ‘कतरिना कैफ’ लवकरच आपल्या सुपरहिट फ्रेंचाइजी ‘टायगर’च्या पुढील सिक्वलमध्ये झळकणार आहे. नुकतंच सोशल मीडियावर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून, ‘टायगर-3’ या चित्रपटाचा टिझर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमान आणि कतरिनाचा हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी 21 एप्रिल 2023 प्रदर्शित होणार आहे.
हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये कटरिना आणि सलमान खान त्यांच्या ‘टायगर’ अंदाजात दिसत आहेत. तसेच चित्रपटात अभिनेता ‘इमरान हाश्मी’ हा एका पाकिस्तानी आयएसआय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. यामुळे यात इमरान हाश्मीचा वेगवेगळा लुक चाहत्यांना पाहण्यास मिळू शकतो.
‘टायगर-3’ चित्रपटाचे काही सिन तुर्कीत सूट करण्यात आले आहे. सलमान आणि इमरान यांच्यातील टस्सल पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेता सलमान खान याने चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करते वेळी… ‘सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये टायगर सिनेमा येणार आहे. ईदच्या दिवशी या सिनेमाच्या स्वागतासाठी सज्ज राहा..’ असं म्हंटलं आहे.