Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये किशोरी लाल शर्मा, त्यांच्या पत्नी आणि सोनिया गांधी, आणि प्रियांका गांधी दिसत आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांचा पराभव केल्यानंतर किशोरी लाल शर्मा, त्यांच्या पत्नी यांनी गांधी कुटूंबियांची भेट घेतली आहे.
View this post on Instagram
खरंतर विजयानंतर किशोरीलाल शर्मा राहुल गांधींना भेटायला आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी केएल शर्मा यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच त्याची तब्येतही विचारली. त्याचवेळी केएल शर्मा यांच्या पत्नीने सोनिया गांधींना सांगितले की,’तुम्ही सिंहाला (‘शेर’) जन्म दिला आहे.’ यावेळी सोनिया गांधी यांनी दिलेल्या उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
व्हिडीओ शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की,’काँग्रेस आणि आमच्या कुटुंबाचे अमेठी-रायबरेलीशी अतूट नाते आहे, ते सेवेचे नाते आहे. किशोरी लाल जी 40 वर्षांहून अधिक काळ अमेठीच्या जनतेच्या सुख-दु:खात त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या सेवेला समर्पित आहे आणि त्यांना खासदार म्हणून निवडून देऊन जनतेने घटनात्मकरित्या त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.या ऐतिहासिक विजयानंतर मी किशोरीजींची भेट घेतली, त्यांचे तोंड गोड केले आणि त्यांचे मनापासून अभिनंदन केले.’
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘राहुल गांधी किशोरीलाल शर्माला पाहताच खासदारांना विचारतात, तुम्ही कसे आहात, तुम्ही आता खुश आहात? निवडणूक कशी झाली, असा सवालही राहुल यांनी केला. यावर केएल शर्मा म्हणाले की, निवडणूक चांगली झाली, मी प्रियंका गांधींनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. सोनियाजींनीही एक संदेश दिला, ज्यामुळे मला बळ मिळाले. ते म्हणाले की, अमेठीच्या भावना गांधी घराण्याशी जोडल्या गेल्या आहेत.
अमेठीशी तुमचे खूप जुने नाते आहे, असे राहुल गांधी म्हणाले, संभाषणादरम्यान केएल शर्मा यांच्या पत्नीने सोनिया गांधींना म्हणाल्या की, तुम्ही सिंहाला जन्म दिला आहे. यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, कारण मी सिंहिणी आहे.’