कानपूर हत्या प्रकरणात आणखी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

 

कानपूर- कानपूर जिल्ह्यात विकास दुबे याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आठ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसुर केल्याच्या कारणावरून आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

त्यात दोन उपनिरीक्षक आणि एका कॉन्स्टबलचा समावेश आहे. हे सर्व जण चौबेपुर पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. विकास दुबे याचे पोलीस अधिकाऱ्यांशी मोठ्या प्रमाणात लागेबांधे आहेत.

विकास दुबेवर छापा टाकण्यात येत असल्याची टीप त्यांच्यापैकीच काही अधिकाऱ्यांनी दुबेला दिली होती अशी माहिती तपासात पुढे आली असून दुबेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आता लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गलथानपणाबद्दल गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.