तीन लोकसभा, 30 विधानसभा पोटनिवडणुकांची घोषणा

नवी दिल्ली – देशातील दादरानगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खांडवा (मध्यप्रदेश) या लोकसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. आणि विविध राज्यातील 30 विधानसभा जागा येथील पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे.

निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. संबंधित राज्यांकडून कोरोना परिस्थिती तसेच इतर संभाव्य नैसर्गिक आपत्तींची माहिती घेऊनच हा कार्यक्रम आयोजित केला गेल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर या निवडणुकांमुळे लवकरच आदर्श आचार संहिता लागू करण्यात येईल, असेही आयोगाने प्रतिपादन केले.

या निवडणुकांसाठी येत्या 30 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. याशिवाय आसाममधील 5, पश्चिम बंगालमधील 4, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालय येथील प्रत्येकी 3, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान येथील प्रत्येकी 2, तर आंध्रप्रदेश हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड आणि तेलंगणा येथील प्रत्येकी 1 विधानसभेची जागा रिक्त असून तेथेही 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.