मुंबई अभिनेता साहिल खान अडचणीत सापडला आहे. एका महिलेवर अश्लिल कमेंट करणे आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध एफआयआर ;दाखल करण्यात आला आहे.अभिनेत्यावर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही देखील करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये साहिल विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा उपनगरातील रहिवासी असलेल्या महिला तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तिचे फेब्रुवारी 2023 मध्ये जिममध्ये काही पैशावरून एका महिलेशी भांडण झाले होते. जिम मधील महिला आणि साहिल खान यांनी फिर्यादीला शिवीगाळ आणि धमकी दिली असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
पैशांवरून सुरु झालेला हा वाद सोशल मीडियापर्यंत गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी सोबत वाद घालणाऱ्या महिलेने आणि साहिल खानने तक्रारदारच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट देखील लिहिली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
साहिल खान आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. स्टाइल, एक्सक्यूज मी, अलादीन आणि रामा: द सेव्हिअर यामध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या हा अभिनेता बराच काळ अभिनय जगतापासून दूर असून त्याचा व्यवसाय सांभाळत आहे. साहिल खान मॉडेलिंगसह जिम आणि फिटनेस ब्रँडचा व्यवसाय देखील करतो.