खैबर पख्तुन्वा, (पाकिस्तान) – पाकिस्तानातील खालावलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या निषेधार्थ तेथील जनतेने आता रस्त्यावर उतरून निदर्शने करायला सुरुवात केली आहे. साऊथ वझिरीस्तानमधील शेकडो नागरिकांनी शनिवारी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आणि जोरदार घोषणाबाजीही केली.
साऊथ वझिरीस्तानमधील वाना जिल्ह्यातील रुस्तम बझार भागात झालेल्या निदर्शनांमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी, आवामी नॅशनल पार्टी, नॅशनल डेमोक्रॅटिक मुव्हमेंट, जमात ए इस्लामी, पश्तुनतहाफुज मुव्हमेंट या राजकीय पक्षांबरोबर अन्य काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सामाजिक संघटनेमध्ये वकील, व्यापारी आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
खैबर पख्तुन्वा प्रांतातील आणि प्रामुक्याने साऊथ वझिरीस्थानमधील आदिवासी बहुल लोकवस्त्यांमध्ये दहशतवादी कारवायांना त्वरित आळा घालण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Seychelles : सेशेल्समध्ये महात्मा गांधी, मंडेलांच्या पुतळ्याची तोडफोड
दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी साऊथ वझिरीस्थानमध्ये गुरुवारी केलेल्या कारवाईमध्ये 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गुप्तचरांच्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनच्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये 2022 या वर्षात किमान 1 हजार नागरिक मरण पावले आहेत. यापैकी बहुतेक हल्ले खैबर पख्तुन्वा प्रांतात पोलीस आणि अन्य सुरक्षा चौक्यांवर करण्यात आले होते.