पिंपरी – चिंचवड येथील रस्टन कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे खोदकाम सुरु असताना गुरुवारी ( दि.22) पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. यामुळे या परिसरात दहा ते पंधरा फुट पाण्याचे कारंजे उडत होते.
महालिकेच्या वतीने रस्टन कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. याठिकाणी खोदकाम सुरु असताना सकाळी अचानकपणे जलवाहिनी फुटली. यावेळी या वाहिनीमूधन दहा फुटापर्यंत पाणी उंच उडत होते.
याबाबत रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. कॉलनीतील अंतर्गत रस्ते सुस्थितीत असताना सिंमेंटचे रस्ते केले जात आहे. दिलेल्या मुदतीमध्ये हे रस्ते तयार करण्यासाठी ठेकेदाराची गडबड सुरु आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या मानवी चुका होत आहेत. तर शहरात पाणीकपात लागू असताना, अशाप्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी नोंदविले.