“त्या’ नेत्यांना जनता अंधारात पाठवणार

आंबेली येथे अतुल देशमुख यांनी आमदार गोरेंचे नाव न घेता केला घणाघात

पाईट- खेड तालुक्‍याला खड्ड्यात ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता आता पुरती खड्ड्यात घालणार आहे. आत्तापर्यंत पश्‍चिम भागाला अंधारात ठेवणाऱ्या नेत्यांना जनता अंधारात ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात अतुल देशमुख यांनी आमदार सुरेश गोरे यांचे नाव न घेता केला.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांची प्रचारसभा आंबोली येथे झाली. या सभेला पश्‍चिम भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रचारसभेचे वैशिष्ट्य म्हणजे या भागातील जनतेने आपापसातील राजकीय मतभेद विसरून एकदिलाने अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून देखमुख यांना विधानसभेवर पाठवायचेच असा चंग बांधला आहे.

या पश्‍चिम भागात अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचा गावभेट दौरा असल्याने या भागातील मुंबई स्थित अतिशय नावाजलेल्या नूतन मुंबई डबेवाले संघटनचे अध्यक्ष अर्जुन सावंत यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला असून मुंबई डबेवाले व नूतन टिफिन सप्लायर्स संघटनेचे पदाधिकारी व डबेवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिसद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, संजय देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, कैलास गाळव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक बाळासाहेब शिंदे, शंकर कोरडे, आडगावचे सरपंच प्रकाश गोपाळे, सुपे गावचे सरपंच प्रकाश मोहन, वाडा गावचे सरपंच रघुनाथ लांडगे, सुदाम शिंदे, लक्ष्मण शिंदे, नामदेव सावंत, भागातील विविध सामाजिक संघटनांनी ज अतुल देशमुख यांना पाठिंबा दिला पश्‍चिम भागातील गावागावातील भांडण तंटे किंवा एकमेकांमधील वादविवाद विसरून मोठ्या संख्येने उपस्थित होते
अतुल देशमुख म्हणालेकी, आजी-माजी आमदार विकासाच्या नुसत्या गप्पा मारतात ते फक्‍त विकासाची आकडेमोड करीत बसले, पण वास्तवात विकासाची मोडतोड केली या तालुक्‍यातील जनतेला मरगळलेला नाही, तर उमद्या ताकदीचा आमदार पाहिजे आहे त्यामुळे मला एक संधी द्या या संधीचे सोने करतो, असे आवाहन त्यांनी केले.

  • तुमच्या या लेकराला पदरात घ्या
    अतुल देशमुख यांच्या मागे कोणीही मोठा नेता नसला तरी त्यांच्यापुढे गावोगावी प्रचंड जनसमुदाय आपला मुलगा-भाऊ मानून कृतकृत्य होत आहे. माय-बाप आपल्या लेकराला दूर लोटेल का उपस्थितांनी नाही असा जल्लोष केला. तुमच्या या लेकराला पदरात घ्या असे आवाहन शरद बुट्टे पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.