अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहचली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर प्रार्थना सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांसोबत कनेक्ट राहत असते. नुकतेच तिने दिवाळीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. हीच माझी दिवाळी असं म्हणत तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओ मुळे प्रार्थना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या घरात चार व्यक्ती बसल्या आहेत आणि त्या कॅरम खेळत आहेत. या चार व्यक्तींना एकत्र पाहून हीच माझी दिवाळी असं तिने लिहिलं आहे. या चार व्यक्ती तिच्या फार जवळच्या आहेत. या व्यक्ती दुसरा तिसऱ्या कुणी नसून तिचे आई- वडील आणि सासू- सासरे आहेत. या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिलं, ‘हीच माझी दिवाळी. माझा खरा आनंद. आई बाबा आणि मम्मी- पप्पा. माझी दिवाळी, माझा आनंद.’ या व्हिडिओमध्ये तिच्या आई आणि सासूबाई एका टीममध्ये आणि बाबा आणि सासरे एका टीम असल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
प्रार्थना यंदाची दिवाळी तिच्या परिवारासह अलिबाग येथील फार्महाउसवर दिवाळी साजरी करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. विशेष म्हणजे प्रार्थनाने एक स्टोरी पोस्ट करत फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय आपण फोडलेल्या फटाक्यांमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो, त्यांना इजा होते त्यामुळे तिने सगळ्यांना फटाके न फोडण्याची विनंती केली आहे. दरम्यान, प्रार्थनाच्या या व्हिडिओनंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.