Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत: वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे मुलगा अभिषेक बच्चन याने देखील बॉलीवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. अभिषेकने 2003 साली अभिषेक बच्चन यानं ‘मैं प्रेम की दिवानी हुं’ या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. त्यानंतर आता बिग बींचा नातू, श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा अगस्त्या नंदा हा ‘द आर्चिज’ या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. यासाठी ते खूप उत्सुक आहेत.
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. आता त्यांनी अगस्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नातवाच्या डेब्यूच्या निमित्तानं एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी ‘द आर्चिज’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. त्यांनी आपल्या नातवाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
”अगस्त्या, माझ्या लाडक्या, तुला माझा खूप आशीर्वाद. मी तुझ्यासोबत आहे. अशाप्रकारे तू तुझी जळती मशाल ही पुढे घेत जा.” यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या संपुर्ण कास्टलाही टॅग केलं आहे. नव्या नवेली नंदानं या पोस्टखाली रिएक्ट केलं आहे. बहीण नव्या नंदा आणि मामा अभिषेक बच्चन यांनीही अगस्त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. सुहाना खान, अगस्त्या नंदा, खुशी कपूर, अदिती सिहेगल, मिहिर अहुजा, वेदांग रैना, युवराज मेंदा अशी तगडी स्टारकास्ट यावेळी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे अमिताभ यांची तिसरी पिढी देखील बॉलिवूड गाजवायला सज्ज झाली आहे.