Solapur Lok Sabha Election 2024 । सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात स्वागत केले.
राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झालेत. सातपुते यांच्या विरोधात पोस्ट देखील केल्या जातायेत. ज्यात ‘चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडला परत पाठवूया’ अशा पोस्टकरण्यात येतायेत. त्यामुळे सोलापुरच्या निवडणुकीत ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असा थेट प्रचाराचा मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, याला राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलतांना सडेतोड उत्तर दिल आहे. माझ्या आई वडिलांनी सोलापुरात ऊसतोड काम केले आहे. मी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. ही लढाई ऊसतोड कामगाराचा मुलगा विरूद्ध माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी’ अशी होणार आहे. असं म्हणत राम सातपुतेंनी शिंदे यांच्या टीकेवर प्रतिउत्तर दिल आहे.
पहा राम सातपुते यांचा व्हिडिओ
हे वाचलं का ? मला सोलापूरात शिक्षण, जॉब मिळेना, गाव सोडून जावं लागतं…? कु. प्रणितीताई शिंदे, सातपुतेंना बेरोजगार युवकाने विचारला जाब