प्रथमोपचार पेटीत ‘ह्या’ गोष्टी असाव्यात

घरात आवश्‍यक असणारी गोष्ट म्हणजे प्रथमोपचार पेटी. विशेष करून घरात लहान मुले असतील तर हिची फारच आवश्‍यकता. सुटीत मुले खेळतात, धडपडतात, खरचटून घेतात, तेव्हा प्रथमोपचार पेटी आवश्‍यक असते. यात पुढील गोष्टी असाव्यात.

1) निरनिराळ्या आकाराच्या बॅंडेज पट्ट्या 2) जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी 3) चिकटपट्टी 4) त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बॅंडेजेस 5) औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस 6) बॅंड-एडस्‌ 7) कैची 8) छोटा चिमटा 9) स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे 10) अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन) 11) थर्मामीटर 12) पेट्रोलियम जेली 13) निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना 14) साबण

त्याचबरोबर डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे:

1) ऍस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक गोळ्या 2) मधमाश्‍यांच्या दंशावरील अँटीहिस्टामाईन मलम 3) जुलाब थांबविण्यासाठी गोळ्या 4) अँटासिड (पोटदुखीसाठी) 5) वेदनाशामक गोळ्या प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी. पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरित बदलावीत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here