बॉलीवूडकरांपासून तर सर्वसामान्यांपासून सगळेच मांसाहार करत असतात. अनेकांना त्यातील वेगळे वेगळे पदार्थ टेस्ट करायला आवडतात. मात्र काही बॉलीवूड अभिनेत्यांनी मांसाहाराला रामराम ठोकला आहे. त्यातील अनेकांची फिगर पाहून आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र शाकाहारी झाल्यापासून त्यांना अधिक चांगलं काम करण्यास स्फुर्ती मिळाली असं तेच सांगताना दिसतात
अमिताभ बच्चन ही सुरुवातीपासून शाकाहारी नव्हते. मात्र २००२ मध्ये त्यांनी पूर्ण शाकाहार स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी मांसाहार, धूम्रपान आणि दारूपासून अलिप्तता साधली आहे. २००२ मध्ये पेटाने देखील अमिताभ बच्चन यांना जगातील सर्वात हॉटेस्ट शाकाहारी व्यक्ती म्हणून सन्मानित केले होते. शाहीद कपूरचा देखील समावेश आहेय
जॅकलिन फर्नांडिस हिनेदेखील 2013 पासून शुद्ध शाकाहारी जेवण स्वीकारले आहे. शाकाहारी असणे सर्वात चांगले असल्याचे तिचे म्हणणे आहे. यामुळे प्राण्यांची होणारी हत्या, पर्यावरणावर याचा होणारा परिणाम तसेच स्वतःचे आरोग्य देखील चांगले राखण्यास मदत होत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
कंगनाचा जन्म एका राजपूत कुटुंबात झाला आहे. त्यामुळे तेथे मांसाहार तर साधी गोष्ट आहे. मात्र २०१४ मध्ये तिने सांगितले कि, तिने मांसाहार सोडला असून ती केवळ शाकाहारी भोजन करते.