एक दिवसीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी 2021 हे वर्ष तितके खास नव्हते. यंदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी20 विश्वचषकामुळे एकदिवसीय क्रिकेटकडे बहुतांश आघाडीच्या संघांनी दुर्लक्ष केले.
विशेष म्हणजे, एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाने या वर्षी केवळ तीन एकदिवसीय सामने खेळले. तर 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारताने 2021 मध्ये फक्त सहा एकदिवसीय सामने खेळले.
2021 मध्ये फक्त श्रीलंका, बांगलादेश आणि आयर्लंड यांनी दहा पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत.
याच पार्श्वभूमीवर यंदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणार्या 3 गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर:
1 दुष्मंथा चमीरा, श्रीलंका (20 बळी)
2021 मध्ये 20 एकदिवसीय बळी मिळवणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा हा एकमेव खेळाडू आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेसाठी साठी 13 डावात 20 फलंदाजांची शिकार केली. त्याचा इकॉनॉमी रेट 5.51 होता तर बॉलिंग स्ट्राईक रेट 31.9 होता. चमीराने या वर्षी बांगलादेशविरुद्ध पहिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच बळी मिळवण्याता पराक्रमही केला होता.
2. सिमी सिंग, आयर्लंड (19 बळी)
भारतीय वंशाचा क्रिकेटपटू सिमी सिंगआयर्लंडसाठी यावर्षी ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला. उजव्या हाताच्या ऑफ-ब्रेक गोलंदाजाने आयर्लंडसाठी 11 डावात 19 बळी घेतले. यावर्षी त्याने एका सामन्यात पाच बळी मिळवण्याचा पराक्रमही केला.
3 संदीप लामिछाने, नेपाळ (18 बळी)
नेपाळचा नवा कर्णधार संदीप लामिछाने या वर्षातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाजांपैकी एक होता. संदीपने 2021 मध्ये केवळ पाच एकदिवसीय डावात गोलंदाजी करत 18 फलंदाजांना तंबूत धाडले. यामध्ये एका सामन्यात दोन वेळा 4 आणि एक वेळा 5 बळी घेतले.
लामिछानेने 10 सप्टेंबर 2021 रोजी पापुआ न्यू गिनी विरुद्ध 6/11 अशी स्वप्नवत गोलंदाजी केली.