नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यासह विषाणूविरूद्धच्या लढ्यात तीन प्रमुख निर्णय जाहीर केले. देशभरात करोना लसीकरणाने १४३ कोटींचा आकडा पार केला आहे. त्याचबरोबर १५ ते १८ वयोगटातील बालकांचे लसीकरणही ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की मुलांच्या लसीकरणाचा स्लॉट कसा बुक केला जाईल आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल? खरं तर, १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणासाठी नोंदणी करणे खूप सोपे आहे. तुम्ही १ जानेवारीपासून CoWIN प्लॅटफॉर्मवर तुमच्या १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ऑनलाइन लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. नोंदणीसाठी अतिरिक्त 10 वे ओळखपत्र जोडण्यात आले आहे, कारण सर्व मुलांकडे आधार किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसू शकतात. चला तर, जाणून घेऊया ही नोंदणीची सोपी प्रक्रिया.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
ऑनलाइन लसीकरण स्लॉट १५ वर्षे ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी देखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
* सर्वप्रथम, तुम्हाला CoWIN प्लॅटफॉर्मवर जावे लागेल, येथे तुम्हाला मुलाबद्दल काही माहिती द्यावी लागेल जसे की नाव आणि वय. यानंतर मुलांचे आधार किंवा दहावीचे ओळखपत्र द्यावे लागेल. असे केल्याने ही प्रक्रिया सहज पूर्ण होऊ शकते.
* या मुलांचे पालक स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा पीसीद्वारे ऑनलाइन लसीकरण स्लॉट बुक करू शकतात. यासाठी कोणालाही घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही.
* या प्लॅटफॉर्मद्वारे १ जानेवारीपासून पालकांना त्यांच्या पाल्यांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. तुमच्या घरात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हीही या सोप्या प्रक्रियेच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया घरी बसून पूर्ण करू शकता.