मुंबई – अभिनेत्री रेणुका शहाणेने 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत काम केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेणुकाने सेटवर माधुरीशी संबंधित एक किस्सा शेअर केला. रेणुकाने सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर वॉशरूम नव्हते, त्यामुळे शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसात ती पाणी पिणे टाळायची’ असेही तिने सांगितले आहे.
सेटवर ही गोष्ट माधुरीच्या लक्षात आली. त्यानंतर तिने रेणुका यांना हायड्रेटेड राहण्याचा मौल्यवान सल्ला दिला. तसेच त्यांना बाहेरच्या शूटमध्येही पाणी पिण्यासाठी प्रोत्साहित केले. वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेणुका म्हणाली, ‘माधुरीने मला सांगितले की, सेटवर वॉशरूमची समस्या असली तरीही तुम्ही कमी पाणी पिऊ नका. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. माधुरी म्हणाली की, तुम्ही आऊटडोअर शूटवर असलात तरी कमी पाणी पिऊ नका. आम्ही चार महिलांना सोबत घेऊन व्यवस्थापित करू, पण कमी पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतील.’
रेणुका पुढे म्हणाली, ‘त्यावेळी सेटवर खूप स्टिंगिंग लाइट्स वापरले जायचे आणि रिफ्लेक्टरही खूप कठीण होते. जर कोणी पाणी प्यायले नसेल तर त्याला डी-हायड्रेशन होऊ शकते. माधुरीचा सल्ला माझ्यासाठी खूप मोलाचा होता कारण मी सेटवर पहिले दोन दिवस पाणी प्यायले नव्हते. हॉटेलवर पोहोचल्यावरच पाणी प्यायचो.’ असही तिने सांगितलं
1994 मध्ये रिलीज झालेल्या हम आपके है कौनने त्यावेळी जगभरात 250 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या दोघांशिवाय रेणुका शहाणे, मोहनीश बहल, अनुपम खेर, रीमा लागू यांच्यासह अनेक मोठे कलाकार या चित्रपटात दिसले होते.